निवडणूक म्हटली कि पैश्याचा खेळ आलाच. पाचशे हजाराच्या नोटांवर 8 नोव्हेंबर 2016 ला बंदी घालण्यात आली आणि आता निवडणुकीतला पैश्याचा प्रवाह आटणार अशी ग्वाही देत काळ्या पैशाविरोधातले बिगुन भारतात वाजले खरे. परंतु आता ह्याच नोटांचा खेळ आता वेगळ्या स्वरुपात रंगणार आहे, तो थेट दक्षिण आफ्रिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत. विशेष म्हणजे भारतातल्याप्रमाणेच दक्षित आफ्रिकेतही 2019 मध्येच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी+ ह्यांनी 500
आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्या. आपल्या हक्काचे पैसे बदलून घेण्यासाठी लोकांच्या बँकांसमोर रांगा लागल्या. आणि जुन्या नोटा फक्त एक कागदाचा तुकडा बनून राहिल्या आणि आता या नोटांचा लगदा लाकडाच्या भूश्याशी एक्जीव करून लाकडी फलक बनविले जाणार आहेत. हे फलक दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक प्रचाराचे साहित्य म्हणून निर्यात करण्यात येणार आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews